kerala tourism
sakal
- नितीन बिनेकर
तिरुवनंतपुरम - देशांतर्गत पर्यटकांनी केरळमच्या पर्यटनाला विक्रमी उंचीवर नेले असताना विदेशी पर्यटकांची संख्या मात्र अद्याप कोविडपूर्व पातळीपासून दूर आहे. २०२५ मध्ये केरळममध्ये तब्बल २ कोटी ५० लाख ५८ हजार ३६६ देशांतर्गत पर्यटक भेटी झाल्या. याच काळात विदेशी पर्यटकांच्या ८ लाख २१ हजार ९९९ भेटी नोंदल्या गेल्या.
विदेशी पर्यटकांच्या भेटी २०१९ च्या तुलनेत अजूनही ३०.९१ टक्क्यांनी कमी आहेत. त्यामुळे देशी पर्यटकांच्या जोरावर पर्यटन वाढत असले, तरी जागतिक बाजारपेठेत विदेशी पर्यटकांचा ‘गॅप’ भरून काढण्याचे आव्हान कायम आहे.
या पार्श्वभूमीवर केरळम सरकार नव्या पर्यटन धोरणाची तयारी करत आहे. विदेशी बाजारपेठांचा विस्तार करण्यासोबतच क्रूझ, वेलनेस, आयुर्वेद, ग्रामीण आणि कृषी पर्यटन, होमस्टे, मान्सून तसेच अनुभवाधारित पर्यटनावर भर दिला जाणार आहे.