CPM Leader MA Baby Washes Dishes to Woo Voters
sakal
तिरुअनंतपुरम - केरळमध्ये या वर्षी मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीएम) राष्ट्रीय सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी एका मुस्लिम कुटुंबाच्या घरी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी चक्क त्या कुटुंबीयांची भांडी घासल्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहेत.