esakal | 11 वर्षांपासून होती बेपत्ता; प्रियकरासोबत लपून राहत होती शेजारीच
sakal

बोलून बातमी शोधा

couple

केरळच्या पल्लकड जिल्ह्यातील अयालूर गावात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला आहे. गेल्या 11 वर्षांपासून बेपत्ता असलेली 29 वर्षीय महिला सापडली आहे.

11 वर्षांपासून होती बेपत्ता; प्रियकरासोबत लपून राहत होती शेजारीच

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

तिरुवनंतपुरम- केरळच्या पल्लकड जिल्ह्यातील अयालूर गावात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला आहे. गेल्या 11 वर्षांपासून बेपत्ता असलेली 29 वर्षीय महिला सापडली आहे. विशेष म्हणजे महिला तिच्या कुटुंबियांपासून 500 मिटर दूर असलेल्या एका खोलीमध्ये राहत होती. सजिथा 2010 पासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांनी हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. पण, तपास पुढे जाऊ शकला नाही. महिला इतक्या जवळच लपून राहत असल्याच्या माहितीने कुटुंबियांना धक्का बसलाय. (Kerala woman found living secretly with lover in house next door Missing for 11 years)

सजिथा आणि रेहमान एकमेकांवर प्रेम करायचे. रेहमानसोबत राहण्यासाठी सजिथानं घर सोडलं. रेहमानला इतर कुठे घर घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. सजिथा आणि रेहमान एका छोट्या खोलीमध्ये राहू लागले. विशेष म्हणजे रेहमानच्या घरी आणखी चारजण राहत होते. पण, त्यांनाही सजिथा आपल्याच घरातील एका खोलीत राहत असल्याचं माहीत नव्हतं. रेहमानचे आई-वडिल, बहीण आणि भाचा त्याच ठिकाणी राहायचे. पण, त्यांना या 11 वर्षाच्या काळात सचिथा आपल्याच घरी राहत असल्याचा थांगपत्ता लागला नाही.

हेही वाचा: शरद पवार-प्रशांत किशोर भेटीची काय 'रणनीती'?

रेहमान यासाठी खबरदारी घेत होता. रेहमानने घरच्यांना त्याच्या खोलीमध्ये येण्यास मनाई केली होती. तो बाहेर जाताना घराला कुलुप लावून जायचा. शिवाय तो जेवनही आपल्या खोलीमध्येच करायचा. अनेकवेळा तो कामाला न जाता घरीच राहयचा. कामाला जातेवेळी त्याने घेतलेला डब्बा खोलीमध्येच सोडून जायचा. जेणेकरुन सजिथाला दुपारचं जेवन मिळावं. रात्रीच्यावेळी सजिथा खोलीबाहेर यायची आणि अंघोळ वगैरे करायची. तब्बल 11 वर्ष सजिथा लपून होती. अखेर एका दशकांनतर रेहमान-सजिथा यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: मुंबईत पाऊस is Back!! लोकल सेवा सुरळीत; रस्ते वाहतूक मंदावली

मार्च 2021 पासून रेहमान बेपत्ता झाला होता. त्यानंतर घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी 7 जून रोजी रेहमानला पकडलं. रेहमानच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. रेहमानने सजिथासोबत गेल्या 11 वर्षांपासून राहत असल्याचे कबुल केले. सजिथानेही पोलिसांना आपण रेहमानसोबत राहत असल्याचं मान्य केलं. जोडप्याला कोर्टासमोर उपस्थित करण्यात आलं होत. कोर्टाने सजिथाला रेहमानसोबत राहण्यास परवानगी दिली आहे. 'इंडिया टूडे'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.