Video: तिने गांडुळासारखं अजगराला धरलं अन्...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

एका महिलेने अजगराला गांडुळासारखं धरलं आणि एका गोणीत भरला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, महिलेच्या धाडसाचे कौतुकही होत आहे.

तिरुअनंतपुरम: एका महिलेने अजगराला गांडुळासारखं धरलं आणि एका गोणीत भरला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, महिलेच्या धाडसाचे कौतुकही होत आहे.

विद्या राजू (वय 60) असे महिलेचे नाव आहे. विद्या या सर्पमित्र म्हणून काम करतात. एका कुटुंबाच्या आवारामध्ये मोठे अजगर आढळले. याबाबतची माहिती विद्या यांना मिळाल्यानंतर त्या तत्काळ घटनास्थळी आल्या व अजगराला राजू नावाने हाक मारत त्याला अलगद पकडले व गोणीत भरले.

'कोची परिसरामध्ये अजगर व मोठ्या सांपांची संख्या मोठी आहे. एखाद्या भागात साप अथवा अजगर आढळून आल्यास नागरिक विद्या यांना माहिती देतात. विद्या या तत्काळ घटनास्थळी येऊन साप, अजगराला पकडतात व निसर्गाच्या सानिध्यात नेऊन सोडतात. विद्या यांनी 1000 हून अधिक साप व अजगरांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडले आहे,' अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱयांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kerala women rescues live python form kochi