PM मोदींच्या जंगलसफारीचा स्वॅग पाहून इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू गेला भारावून

PM मोदींच्या जंगलसफारीचा स्वॅग पाहून इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू गेला भारावून

इंग्लंडच्या क्रिकेटरने पंतप्रधान मोदींचे केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. बांदीपूर आणि मुदुमलाई वन्यजीव प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. दरम्यान, ट्विटरवर मोदींच्या या दौऱ्यासह एक वेगळीच चर्चा रंगली आहे. इंग्लंडचा क्रिकेटर पीटरसनने पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विट करत कौतुक केले. (Kevin Pietersen shares pic of PM Modi from Bandipur Tiger Reserve calls him Hero )

टायगर प्रोजेक्टला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी यांनी हा दौरा केला. यावेळी त्यांनी आपल्या कॅमेरातून एक सौ एक सुंदर छायाचित्रं काढली. त्यांनी स्वत:च्या हाताने हत्तीला ऊस खाऊ घातला आणि दुर्बिणीच्या साहाय्याने जंगलामधील मनमोहक दृश्यांचा आनंदही घेतला.

PM मोदींच्या जंगलसफारीचा स्वॅग पाहून इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू गेला भारावून
Eknath Shinde Ayodhya Visit : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत रामलल्लाचे घेतलं दर्शन

जंगल सफारीचा हा मोदींचा स्वॅग पाहून इंग्लंडचा माजी फलंदाज आणि वन्यजीवप्रेमी केवीन पीटरसन भारावून गेला. त्याने ट्विट करत हीरो अशी उपमा दिली आहे.

"वन्य प्राण्यांवर प्रेम करणारा आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांच्यासोबत वेळ घालवायला खूप उत्सुक असलेला एक जागतिक नेता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चित्त्यांना जंगलात सोडले, वाइल्ड इन इंडिया, हिरो नरेंद्र मोदी" अशा आशयाचे ट्विट पीटरसनने केले आहे.

PM मोदींच्या जंगलसफारीचा स्वॅग पाहून इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू गेला भारावून
Narendra Modi : पंतप्रधानांनी जाहीर केली देशातील वाघांची नवीन आकडेवारी; भारतात सध्या किती वाघ?

पंतप्रधान मोदींनी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्तींच्या छावणीलाही भेट दिली. हा तोच हत्तींचा कॅम्प आहे जिथे ऑस्कर विजेता 'द एलिफंट व्हिस्पर्स' माहितीपटातील रघू (हत्ती) वास्तव्य करतो. 'द एलिफंट व्हिस्पर्स' ही भारतातील पहिली डॉक्युमेंटरी आहे, जिला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

पंतप्रधान मोदींनी बेली आणि बोमन या आदिवासी जोडप्याची भेट घेतली ज्यांनी रघू या हत्तीच्या बाळाला वाढवले. हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केवीन पीटरसनने ट्विट करुन आपल्या मनातील भावना ट्विटरद्वारे बोलून दाखवल्या आहेत.

महिन्याभरापूर्वी घेतली पंतप्रधानांची भेट

केविन पीटरसन भारत दौऱ्यावर असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दोघांच्या या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केविन पीटरसनचे कौतुक करण्यात आले होते.

यावेळी त केविन पीटरसनने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि त्यांना वैयक्तिकरित्या भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ही भेट झाली होती. यापूर्वी केविन पीटरसनने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com