
नवी दिल्ली : सरसेनाध्यक्ष अनिल चौहान यांनी सिंगापूरमध्ये दिलेल्या मुलाखतीतील विधाने लक्षात घेता ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करताना मोदी सरकारने देशाची दिशाभूल केली, असा आरोप आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.