
बक्सर : ‘‘भाजप आणि संयुक्त जनता दल (जेडीयू) यांच्यातील युती ही संधीसाधू आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार हे केवळ ‘खुर्ची’ असते तिकडेच झुकतात,’’ असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी केला. काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जय बापू, जय भीम, जय संविधान रॅलीमध्ये ते बोलत होते.