

Khelo India Scheme Boost Central Government Releases 565 Crore for State Sports Infrastructure Projects
sakal
नवी दिल्ली: केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’ योजनेच्या नव्या स्वरूपात राज्यांनाही सहभागी करून घेत क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ५६५ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. पुढील पाच वर्षांत होणाऱ्या क्रीडा प्रकल्पांसाठी हा निधी राज्यांना देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच ‘खेलो इंडिया’ योजनेसाठी २९, ०५४ कोटी रुपये आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघ सहाय्य योजनेसाठी ७, ३८७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.