Sikh Family Kidnappe : धक्कादायक! अमेरिकेत अपहरण झालेल्या भारतीय कुटुंबातील चौघांचा मृतदेह सापडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kidnapped California Sikh family  including baby  found dead

Sikh Family Kidnappe : धक्कादायक! अमेरिकेत अपहरण झालेल्या भारतीय कुटुंबातील चौघांचा मृतदेह सापडला

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया इथं पंजाबच्या ज्या कुटुंबाचं अपहरण झालं होतं त्या चार सदस्यांचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. यामध्ये एका आठ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. पंजाबी कुटुंब वास्तव्यास असलेल्या परिसरातच त्यांचे मृतदेह आढळून आले.(Kidnapped California Sikh family including baby found dead)

कुटुंबातील चौघांचे मृतदेह एका बागेत सापडले. राज्याचे शेरिफ वर्न वार्नके यांनी ही माहिती दिली. आम्हाला ज्याची भीती होती, नेमकं तेच घडलं, असं वार्नके म्हणाले. मृतांमध्ये ८ महिन्यांची आरुही धेरी, तिची आई जसलीन कौर (२७), वडील जसदीप सिंग (३६), जसदीप यांचा भाऊ अमनदीप सिंग (३९) यांचा समावेश आहे. एका लुटारून कुटुंबाचं अपहरण केलं. एक दिवसानंतर त्यानं स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आधी पोलिसांकडून देण्यात आली होती.

नेमकं काय आहे प्रकरण?

सेंट्रल व्हॅलीतील रहिवासी असलेल्या या कुटुंबाचे मर्केल काउंटीतील एका व्यावसायिक ठिकाणाहून सोमवारी अपहरण करण्यात आले. ३ ऑक्टोबरला दक्षिण हायवे क्रमांक ५९ वरून चौघांचं जबरदस्तीनं अपहरण करण्यात आलं होतं, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी कोणत्याही संशयिताचं नाव सांगितलं नाही. पीडित कुटुंबाचा अमेरिकेत वाहतूक व्यवसाय होता. हे कुटुंब मूळचं पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील टांडामधील हरसी गावचं होतं.

यापूर्वी २०१९ मध्ये घडलेल्या अशाच एका घटनेत भारतीय वंशाचे व्यावसायिक तुषार अत्रे हे त्यांच्या गर्लफ्रेंडच्या कारमध्ये मृतावस्थेत सापडले होते. ते एका डिजिक मार्केटिंग कंपनीचे मालक होते. त्यांचे कॅलिफोर्नियामधील त्यांच्या आलिशान घरातून अपहरण करण्यात आले होते.

टॅग्स :crimeamerica