
नवी दिल्ली : प्रशांत महासागरातील हवाई बेटे ही लक्षावधी वर्षांच्या ज्वालामुखींच्या उद्रेक व भूगर्भीय हालचालीतून तयार झाली. हवाई हे अमेरिकेचे पन्नासावे राज्य. त्यातील सर्वाधिक जागृत ज्वालामुखी होय किलावेआ (Kilauea). तो बिग आयलँड या बेटावर आहे. अमेरिकेतील हे सर्वात मोठे बेट आहे. 23 डिसेंबर, 2024 पासून तो तब्बल चारशे ते सहाशे फूट उंच उडतोय. त्याचे रूद्र स्वरूप पाहावयास पर्यटकांची गर्दी होत आहे.