
नवी दिल्ली : घरात पैसे सापडल्याच्या आरोपावरून चर्चेत आलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव मांडला जाणार आहे. या प्रस्तावावर आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त खासदारांची स्वाक्षरी झाली असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.