Kirit somaiya
Kirit somaiya esakal

Kirit Somaiya News : विरोधकांच्या रडारवर असलेले सोमय्या अचानक दिल्ली दौऱ्यावर; भाजपच्या वरिष्ठ नेत्याची घेतली भेट

Published on

Viral Video : भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अडचणी सापडले आहेत. या व्हिडीओमुळे राजकीय विरोधकांडूव आरोप केले जात असून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी होत आहे. या मुद्द्यावर महराष्ट्रात विरोधक आक्रमक झालेले असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या काल दिल्लीत पोहचले.

किरीट सोमय्या यांच्यावर व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून आरोप होत असताना सोमय्या दिल्लीत पोहचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी विरोधी पक्षांकडून होत असताना सोमय्या दिल्लीत आल्याने चर्चाना उधाण आले . तसेच या दिल्ली भेटीदरम्यान सोमय्या यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याची भेट घेतल्याचीही चर्चा देखील आहे. संसदेच्या पहिल्याच दिवशी सोमय्या संसद परिसरात दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

Kirit somaiya
Maharashtra Rain Updates : ठाणे, पालघर अन् रायगडला आजही रेड अलर्ट!

किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांविरोधात ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाकडे भ्रष्टाचाराचे आरोप करत तक्रार दाखल केली आहे. आतापर्यंत त्यांनी भाजपच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीमुळे अनेक नेते राजकीयदृष्ट्या अडचणीत आले आहेत.

किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली . मात्र, या व्हिडिओनंतर किरीट सोमय्या स्वतः अडचणीत सापडले आहेत. त्याच्या एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Kirit somaiya
Wi vs Ind 2nd Test : घर के शेर, बाहर ढेर... गिलचा एका निर्णय अन् करिअर आले धोक्यात?

सध्या या मुद्द्यावर किरीट सोमय्या यांनी आपली भूमिका मांडली असून त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे . ज्यात त्यांनी लिहिले आहे की, मी कोणत्याही महिलेव अत्याचार केले नाहीत. माझ्यावर आरोप केले जात आहेत. ज्या व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यांची सत्यता तपासली पाहिजे.

दरम्यान विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील हा मिद्दा गाजला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (उद्धव ठाकरे गट) यांनी किरीट सोमय्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली . त्यांनी किरीट सोमय्या यांच्याबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत, असे देखील सांगितले आहे. दरम्यान या आरोपांच्या पार्श्वभूमिवर आता किरीट सोमय्या दिल्लीत पोहचल्याने चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com