

kishore kumar award given to Raghuvir Yadav
esakal
मध्य प्रदेश : ज्येष्ठ अभिनेते रघुवीर यादव यांना मध्य प्रदेश सरकारचा प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय किशोर कुमार सन्मान २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. खंडवा येथे आयोजित अलंकरण सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी आभासी माध्यमातून सहभागी होत यादव यांचा गौरव केला. या सन्मानांतर्गत त्यांना ५ लाख रुपयांचा धनादेश, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी किशोर कुमार यांची जन्मभूमी असलेल्या खंडवा येथे लवकरच विमानतळ उभारण्याची घोषणाही केली.