धक्कादायक! विवाहपूर्व संबंधांतून अर्भकाचा जन्म झाला अन् आईनेच तोंड दाबून बाळाचा खून केला, बाथरूममध्ये प्रसूती झाली अन्..

Kittur Police : कित्तूर तालुक्यातील अर्भकाच्या खूनप्रकरणी कित्तूर पोलिसांनी (Kittur Police) दोघांना अटक केली आहे. मुस्कान ऊर्फ सिमरन व महाबळेश्वर अशी संशयितांची नावे आहेत.
Newborn Baby Murder Case
Newborn Baby Murder Caseesakal
Updated on
Summary

मुस्कान ऊर्फ सिमरन आणि महाबळेश्वर यांच्यात तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यातूनच ती तरुणी गरोदर झाली. तिने बाळाला जन्म दिला.

बेळगाव : कित्तूर तालुक्यातील अर्भकाच्या खूनप्रकरणी कित्तूर पोलिसांनी (Kittur Police) दोघांना अटक केली आहे. मुस्कान ऊर्फ सिमरन व महाबळेश्वर अशी संशयितांची नावे आहेत. विवाहपूर्व शारीरिक संबंधांतून शिशूचा जन्म झाला होता. यामुळे दोघांनी पहिल्यांदा अर्भकाचा खून केला. यानंतर अंबडगट्टीत मृतदेह फेकल्याचे चौकशीत पुढे आल्याचे जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद (Bhimashankar Guled) यांनी सोमवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com