कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक V; असा आहे 3 लशींमध्ये फरक

Covaxin,Covishield ,Sputnik V
Covaxin,Covishield ,Sputnik V

नवी दिल्ली : नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल (Niti Aayog member) यांनी काल गुरुवारी केंद्र सरकारच्या लशीकरणासंदर्भातील योजनेची रुपरेषा सांगितली आहे. त्यांनी म्हटलंय की, सरकार एकूण आठ लशींद्वारे भारतातील सर्व नागरिकांचे 2021 वर्षाच्या अखेरपर्यंत लसीकरण (COVID-19 vaccines) करण्याच्या नियोजनात आहे. बायोलॉजिकल ई, झायडस कॅडिला, नोवाव्हॅक्ससाठी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडिया, नेझल व्हॅक्सिनसाठी भारत बायोटेक आणि स्पुटनिक व्ही (Biological E, Zydus Cadila, Serum Institute of India for Novavax, Bharat Biotech nasal vaccine, Gennova and Sputnik V) या लशींच्या आपत्कालीन वापरसाठी मान्यता तसेच लस उत्पादनात वाढ करण्यावर जोर दिला आहे. मात्र, सध्यातरी येत्या आठवड्यापासून भारताकडे लशीसाठी तीन पर्याय उपलब्ध असणार आहेत. यामध्ये रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही, ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाची लस कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस समाविष्ट आहे. रशियाची ही लस एडीनेव्हायरस व्हेक्टरवर आधारित असल्याचं सांगण्यात आलंय तसेच ही लस जगातल्या 59 देशांमध्ये मंजूर करण्यात आली आहे. (Know all about Covishield Covaxin Sputnik V COVID19 vaccine comparison)

Covaxin,Covishield ,Sputnik V
हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल

स्पुटनिक व्ही या लशीला Gam-Covid-Vac या नावाने देखील ओळखलं जातं. दोन वेगवेगळ्या अ‍ॅडेनोव्हायरसेस (Ad26 and Ad5) वर आधारित ही लस आहे, ज्या व्हायरसमुळे साध्या सर्दीचा त्रास होतो. हे अ‍ॅडेनोव्हायरस उपचारांसाठी SARS-CoV-2 सह एकत्रित केले आहेत, ज्यामुळे शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. रशियाने कोविडच्या या लसीचं नामकरण हे Sputnik V ला या त्यांच्या पहिल्या उपग्रहावरून केले आहे. ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीलाही देण्यात आली होती. ही लस मॉस्कोमधील गमालिया इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी एँड मायक्रोबायोलॉजीने तयार केली आहे. बीएमजे या अग्रगण्य पीअर-रिव्ह्यूड मेडिकल जर्नलने यापूर्वी स्पुटनिक व्ही लशीवर लिहिले होते. या मेडिकल जर्नलमध्ये नमूद केलं होतं की, “जागतिक आरोग्य संघटनेने मार्च २०२० च्या सुरुवातीला कोविड -19 साथीचा जाहीर केला. त्यापुर्वीच मॉस्कोमधील Gamaleya National Center of Epidemiology and Microbiology स्पुटनिक व्हीच्या प्रोटोटाइपवर काम करत होती, ज्याला Russian Direct Investment Fund (RDIF) ने निधी पुरवला आहे.

Covaxin,Covishield ,Sputnik V
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी केजरीवालांची मोठी घोषणा

भारतातील ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाची कोविशील्ड ही लस देखील याचप्रकारच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. चिंपाझींमधील एडेनोव्हायरसच्या कमकुवत प्रकारापासून ही लस तयार करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला, पूर्णपणे भारतीय बनावटीची असणारी कोव्हॅक्सिन ही लस इनऍक्टीव्ह प्रकारातील लस आहे, जी मेलेल्या कोरोनाव्हायरसपासून बनवण्यात आली आहे. भारतातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमधून कोरोना व्हायरसचा नमूना भारत बायोटेकने वापरला आहे. बीबीसीच्या रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, रोगप्रतिकारक पेशी मृत विषाणूची देखील ओळख पटवू शकतात आणि रोगप्रतिकारक यंत्रणेस साथरोगाच्या या विषाणूविरूद्ध अँटीबॉडीज बनविण्यास प्रवृत्त करतात. कोवाक्सिनवरील इतर रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं गेलंय की, SARS-CoV-2 या कोरोना व्हायरसविरूद्ध अँटीबॉडीज बनविण्यास प्रतिकारशक्तीच्या प्रणालीस शिकवून आपले कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com