इंडिया गेटवर कसा असेल नेताजींचा पुतळा? जाणून घ्या प्रख्यात शिल्पकाराविषयी सर्वकाही

इंडिया गेटवर कसा असेल नेताजींचा पुतळा? जाणून घ्या प्रख्यात शिल्पकाराविषयी सर्वकाही

नवी दिल्ली : इंडिया गेटवर स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान मोदींनी नुकतीच केली आहे. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे महासंचालक, शिल्पकार अद्वैत गडानायक (Sculptor Awaita Gadanayak) नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) यांच्या प्रस्तावित पुतळ्याचे शिल्पकार असणार आहेत.

इंडिया गेटवर कसा असेल नेताजींचा पुतळा? जाणून घ्या प्रख्यात शिल्पकाराविषयी सर्वकाही
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

आज रविवारी संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान मोदी (PM Modi) पुतळ्याच्या डिजिटल आवृत्तीचे अनावरण करणार आहेत. हा पुतळा त्याच ठिकाणी बसवण्यात येणार आहे जिथे 1968 पर्यंत जॉर्ज पंचमचा पुतळा होता. पूर्ण झाल्यावर हा पुतळा रायसीना हिल्सवरून दिसेल. हा पुतळा साकारण्याची जबाबदारी असलेले अद्वैत गडानायक हे एक प्रख्यात शिल्पकार आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांची या मोठ्या जबाबदारीसाठी निवड केल्याबद्दल त्यांना आनंद होत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

इंडिया गेटवर कसा असेल नेताजींचा पुतळा? जाणून घ्या प्रख्यात शिल्पकाराविषयी सर्वकाही
धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रामार्गे रविवारी पोचले राज्यात

कोण आहेत अद्वैत गडानायक

  • अद्वैत गडानायक यांचा जन्म ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील नेउलापोई गावात झाला आहे.

  • गडानायक यांनी बीके कॉलेज ऑफ आर्ट्स अँड क्राफ्ट्समधून कला शिक्षण घेतले आहे आणि दिल्ली आर्ट कॉलेजमधून मास्टर्स पूर्ण केले.

  • गडनायक हे लंडनमधील स्लेड स्कूल ऑफ फाइन आर्ट्समध्ये कलेचा अभ्यास करतात. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. यामध्ये 1993 चा राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार; 1999 मध्ये ओडिशा ललित कला अकादमी पुरस्कार इ. पुरस्कारांचा समावेश आहे.

  • त्यांच्या सर्वात प्रसिद्ध प्रकल्पांमध्ये राजघाटातील गांधींच्या दांडी मार्चच्या पुतळ्याचा समावेश आहे. त्यांच्या कलाकृतींना लंडनमध्येही स्थान मिळाले आहे.

  • 2016 मध्ये ते नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे दिग्दर्शक बनले. त्याआधी ते भुवनेश्वरच्या KIIT विद्यापीठात स्कुल ऑफ स्कल्पचरचे प्रमुख होते. युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये त्यांनी एक शिल्पकार उद्यान तयार केले आहे.

पंतप्रधान मोदींनी इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा उभारण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हा पुतळा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पुतळ्यासाठी तेलंगणातील ब्लॅक जेड ग्रॅनाइट स्टोन वापरण्यात येणार असून त्याची रचना सांस्कृतिक मंत्रालयाने तयार केली आहे. पुतळा पूर्ण होईपर्यंत, नेताजींचा होलोग्राम पुतळा त्याच ठिकाणी असेल. ज्याचे अनावरण रविवारी आझाद हिंद फौजेच्या (Azad Hind Fauj) संस्थापकाच्या 125 व्या जयंतीनिमित्त केले जाईल. होलोग्राम हे लेन्सद्वारे तयार केलेल्या प्रतिमेऐवजी प्रकाश क्षेत्राचे छायाचित्रण असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com