लॉकडाऊन 3.0 विषयी सर्वकाही सांगणारी बातमी; वाचा सविस्तर

लॉकडाऊन 3.0 विषयी सर्वकाही सांगणारी बातमी; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक साथीशी लढण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाउन चार मेनंतर आणखी दोन आठवड्यांसाठी म्हणजे १७ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज संध्याकाळी घोषित केला. रेड झोनमधील १३० जिल्ह्यांमध्ये रेल्वे, विमान, आंतरराज्य बससेवा आणि मेट्रोसह सार्वजनिक वाहतुकीवरील संपूर्ण बंदी कायम राहणार आहे. २४ मार्च पासून लागू करण्यात आलेल्या आणि तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी आता ५४ दिवस इतका होणार आहे. 

कोरोना उपद्रवाची तीव्रता लक्षात घेऊन रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे गृहखात्याने जारी केली. त्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांसाठी लक्षणीय सूटही देण्यात आली आहे. सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा जिल्ह्यांची महापालिका क्षेत्र व महापालिकेच्या बाहेरील क्षेत्र अशा दोन झोनमध्ये विभागणी केली जाणार आहे. या बाहेरच्या क्षेत्रात २१ दिवसांमध्ये कोरोना रुग्ण न सापडल्यास त्या जिल्ह्याच्या वर्गीकरणात सुधारणा केली जाईल.

रेड आणि ऑरेंज झोनमध्ये आरोग्य सेतू ॲपचा १०० टक्के वापर केला जावा यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही राहील. या भागात वैद्यकीय सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता अन्य सर्व आर्थिक व्यवहारांवर बंदी असेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दारूविक्रीला परवानगी 

नव्या नियमावलीनुसार मॉल आणि बाजारपेठांमध्ये असलेली दारूची दुकाने बंदच राहणार आहेत. मात्र एखाद्या रस्त्यावर एकच दारूचे दुकान असेल (म्हणजेच ‘स्टँड अलोन’) तर ते दुकान खुले राहील. त्यातही ‘सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळावे लागतील. सिगारेट विक्रीच्या दुकानांबाबत हाच नियम लागू करण्यात आहे. दारू विक्रीतून मोठा महसूल राज्यांना मिळतो. त्यामुळे दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पंजाबसह अनेक राज्यांमधून पुढे आली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सर्व झोनमध्ये या गोष्टी बंदच राहणार 

- विमान प्रवास, रेल्वे, मेट्रो, दोन राज्यांदरम्यान प्रवास 

- शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे कामकाज 

- हॉटेल, चित्रपटगृह, जिम, क्रीडा संकुले 

- सर्व प्रकारचे राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम 

- सायकल रिक्षा, ऑटोरिक्षा, टॅक्सी, कॅब, आंतरजिल्हा बस सेवा, सलून, स्पा 

- एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास (संपूर्ण राज्य ग्रीन झोनमध्ये असल्यास स्थानिक पातळीवरून परवानगी शक्य) 

- ६५ वर्षांवरील व्यक्ती, गर्भवती महिला, दहा वर्षांखालील मुले आणि आजारी व्यक्ती यांना बाहेर पडण्यास मनाई कायम 

रेड झोनमध्ये यांना परवानगी 

- सर्व उद्योग, बांधकाम कामे, मनरेगा अंतर्गत कामे, अन्न प्रक्रिया उद्योग, वीट भट्टी सुरू करण्यास परवानगी 

- ग्रामीण भागात शॉपिंग मॉलव्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू 

- कृषी आणि पशुपालनाशी निगडित व्यवहार 

- बँक, वित्त संस्था, इन्शुरन्स आणि कॅपिटल मार्केट 

- आंगणवाडी 

- प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे 

- आयटी क्षेत्र, डेटा आणि कॉल सेंटर, शीतगृहे, खासगी सुरक्षा सेवा 

- उत्पादन क्षेत्रातील औषधे, वैद्यकीय साहित्य, यंत्र, ज्यूट उद्योग (सामाजिक अंतराचा नियम पाळणे आवश्यक) 

ऑरेंज झोनमध्ये पुढील गोष्टींना परवानगी 

- टॅक्सी आणि कॅब (वाहन चालक आणि एकच प्रवासी ) 

- जिल्ह्यात अंतर्गत वाहतूक 

- चार चाकी गाडीतून दोघांना जाण्यास परवानगी 

ग्रीन झोनमध्ये पुढील गोष्टींना परवानगी 

- बस वाहतूकीस परवानगी, मात्र एका बसमध्ये केवळ ५० टक्केच प्रवासी 

- सर्व प्रकारच्या व्यवहारांना परवानगी; मात्र सामाजिक अंतराचा नियम पाळणे आवश्यक 

- कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम करण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी आवश्यक ; उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com