Marathi Patrakar Din : समाजाला दर्पण दाखवणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांबदद्ल 'या' खास गोष्टी घ्या जाणून

आज मराठी पत्रकार दिन आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८८२ मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळे, आजचा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.
Marathi Patrakar Din
Marathi Patrakar Dinesakal

Marathi Patrakar Din : आज मराठी पत्रकार दिन आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८८२ मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळे, आजचा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जांभेकर यांनी दर्पण या मराठी वृत्तपत्राद्वारे देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ मध्ये कोकणातील पोंभुर्ले या गावात एका सामान्य कुटुंबात झाला होता.

जांभेकर यांचे जीवनमान अवघ्या ३४ वर्षांचे होते. मात्र, जांभेकर यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या विचारांचा ठेवा आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आजच्या या मराठी पत्रकार दिनानिमित्त आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

Marathi Patrakar Din
Patrakar Din : समाजाला ‘दर्पण’ दाखवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी वृत्तपत्र सुरू केलं!
  • बाळशास्त्री जांभेकर यांचे प्राथमिक शिक्षण पोंभुर्ले या गावी झाले. त्यानंतर, ते मुंबईत आले.

  • मुंबईत आल्यावर जांभेकरांनी बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून अध्ययन सुरू केले.

  • बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान मिळवले.

  • १८३४ मध्ये मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.

  • ६ जानेवारी १८३२ मध्ये दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरूवात जांभेकरांनी केली आणि या वृत्तपत्राच्या संपादकपदाची धुरा त्यांनी सांभाळली.

  • अवघ्या २० व्या वर्षी त्यांनी दर्पणच्या संपादकपदाची मोठी जबाबदारी पेलली.

  • बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले.

  • जांभेकरांनी समाजातील वर्णव्यवस्था, स्त्री दास्य, अस्पृश्यता, बालविवाह, जातीभेद इत्यादी गोष्टींवर त्यांनी आवाज उठवला, वृत्तपत्रांतून लिखाण केले. त्यामुळे, त्यांना आद्य समाजसुधारक ही म्हटले जाऊ लागले.

  • मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या तब्बल १० भाषांचे ज्ञान बाळशास्त्री जांभेकरांना होते.

  • या भाषांसोबतच, विज्ञान, भूगोल, गणित आणि सामान्य ज्ञान या विषयांचे त्यांना खोलवर ज्ञान होते.

  • बाळशास्त्री यांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख आणि ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले.

  • मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच पहिल्यांदा वाचकांच्या हाती दिली होती.

  • बाळशास्त्री यांनी सुरू केलेले दर्पण हे वृत्तपत्र साडेआठ वर्षे चालले. त्यानंतर, १८४० मध्ये जुलै महिन्यात या वृत्तपत्राचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला.

  • १८४० मध्ये जांभेकरांनीच 'दिग्दर्शन' या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरूवात केली होती. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी जवळपास ५ वर्षे काम पाहिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com