Kerala: अदानी बंदर प्रकल्पाचा विरोध तीव्र; मच्छिमारांच्या समर्थनार्थ 'फादर्स' मैदानात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kerala

Kerala: अदानी बंदर प्रकल्पाचा विरोध तीव्र; मच्छिमारांच्या समर्थनार्थ 'फादर्स' मैदानात

केरळमधील विझिंजम येथील अदानी बंदर प्रकल्पाला होणारा विरोध तिव्र होत आहे. मच्छिमारांच्या समर्थनार्थ कोचीमधील अनेक चर्चच्या धर्मगुरूंनी आता मानवी साखळी करून निदर्शने केली आहेत. बांधकामादरम्यान किनारपट्टीच्या जमिनीचे नुकसान होत असल्याचा आरोप करत, मच्छिमारांचे पुनर्वसन आणि समुद्राच्या धूपावर कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी करण्यात येत आहे.

गेल्या महिन्यातही शेकडो मच्छीमारांनी राज्याच्या राजधानीत मोठा मोर्चा काढला आणि डाव्या सरकारवर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. 1 सप्टेंबर रोजी केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला अदानी बंदरांच्या चालू असलेल्या विझिंजम बंदर प्रकल्पाला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले होते. आंदोलकांनी बंदर परिसरात घुसू नये, आणि बाहेर शांततेने आंदोलन करावे, असे आदेश पण न्यायालयाने दिले होते. तसेच सांगितल की बांधकामात अडथळा आणू नका.

आंदोलकांचा आरोप

आंदोलकांचा आरोप आहे की, या विझिंजम बंदराचा एक भाग म्हणून ग्रोईन बांधले जात असल्याचा आहे. त्यामुळे येत्या काळात मच्छीमारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Web Title: Kochi Churches Extended Their Support Fishermen Protesting Adani Port Project Vizhinjam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..