अलिशान फ्लॅट असलेल्या इमारती केल्या जमीनदोस्त, पाहा व्हिडिओ

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

केरळ सरकारने अनधिकृत इमारतीविरुद्ध राबविलेल्या कारवाईपैकी ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. कोचीतील किनाऱ्यालगत या चार अलिशान फ्लॅट असलेल्या इमारती उभारण्यात आल्या होत्या.

कोची : केरळमधील कोची शहरातील मराडू भागात अवैधरित्या उभारण्यात आलेल्या अलिशान फ्लॅट असलेल्या चार इमारतीपैकी दोन इमारती स्फोटके लावून जमीनदोस्त करण्यात आल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केरळ सरकारने अनधिकृत इमारतीविरुद्ध राबविलेल्या कारवाईपैकी ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. कोचीतील किनाऱ्यालगत या चार अलिशान फ्लॅट असलेल्या इमारती उभारण्यात आल्या होत्या. सुमारे 350 फ्लॅट या इमारतींमध्ये होते. तसेच सध्या 240 कुटुंबेही तिथे वास्तव्यास होती. सर्वोच्च न्यायालयाने अनेक नियमांचे उल्लंघन करत या इमारती उभारल्याचा निकाल दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

या इमारती पाडण्यासाठी सुमारे 800 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. आज सकाळी अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. इमारत पाडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या कारवाईची चर्चा सुरु आहे. 60 मीटर उंच आणि 18 मजला असलेल्या या इमारती होत्या. अन्य दोन इमारती रविवारी पाडण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kochi Maradu flats demolition through controlled implosion in Kerala