esakal | निराधार! मुलांनी पाठ फिरवल्यानंतर वृद्धावर आली 'ही' वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

निराधार! मुलांनी पाठ फिरवल्यानंतर वृद्धावर आली 'ही' वेळ

निराधार! मुलांनी पाठ फिरवल्यानंतर वृद्धावर आली 'ही' वेळ

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सोशल मीडियावर दररोज असंख्य फोटो, व्हीडिओ व्हायरल होत असतात. यातील काही गोष्टी या मजेशीर असल्यामुळे लक्ष वेधून घेतात. तर, काही गोष्टी खोल काळजावर घाव घालतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका वृद्ध माणसाचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यावर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या असून कोविड काळात त्यांच्या कुटुंबाने त्यांना वाऱ्यावर सोडल्याचं समोर आलं आहे. व्हायरल होत असलेला हा फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उदासिनता, एकटेपणा, असहाय्यपणा सारं काही स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे हे आजोबा सध्या चर्चेत आले आहेत. (kolkata-artist-sunil-pal-selling-his-paintings-on-the-streets-after-his-kids-abandoned-him)

सोशल मीडियावर चर्चेत आलेले आजोबा कोलकात्ता (kolkata) येथील असून वयाची ६० ओलांडलेले हे आजोबा चित्र विकून उदरनिर्वाह करत आहेत. कोरोना काळात त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे आता दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना रोज संघर्ष करावा लागत आहे.

ट्विटवर एका व्यक्तीने या आजोबांचा व त्यांनी रेखाटलेल्या चित्रांचा फोटो शेअर केला आहे. सोबतच या आजोबांना मदत करा असं आवाहनही करण्यात आलं आहे.

"आर्टिस्ट सुनील पाल. कोलकात्तामधील गोल पार्क येथे असलेल्या Axis Bank समोर ते चित्र विकतात. त्यांच्या मुलांनी त्यांना सोडून दिलं आहे. त्यामुळे उदनिर्वाह करण्यासाठी ते दररोज चित्र विकतात. ५०-१०० रुपयांना ही चित्र ते विकतात. सध्याच्या काळात दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. जर तुम्ही कोलकात्तामधील असला तर प्लीज ही चित्र नक्की विकत घ्या", अशी पोस्ट एका नेटकऱ्याने शेअर केली आहे.

पुढे हा युजर म्हणतो, "सुनील पाल हे खासकरुन बुधवार आणि शनिवार या दोन दिवशी या ठिकाणी असतात. सध्या त्यांच्याकडे ग्राहक नाहीत. त्यामुळे प्लीज ही चित्र घ्या. कलेसोबतच कलाकारालाही मदत करा."

दरम्यान, या पोस्टनंतर सुनील पाल हे चांगलेच चर्चेत आले आहेत. आतापर्यंत या पोस्टला १६ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर ६ हजारांपेक्षा जास्त वेळा ही पोस्ट रिट्विट करण्यात आली आहे.