

Kolkata Durga Puja pandal stampede
esakal
Kolkata: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे दुर्गापूजेच्या मंडपात शनिवारी (१७ ऑक्टोबर) संध्याकाळी चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात मोठ्या संख्येने भाविक जमले होते. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर गर्दीत धावपळ सुरू झाली. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून आधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींवर कोलकाता मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.