kolkata murder sujoy roy
देश
Kolkata Doctor Murder: 'तो चांगला माणूस नाही'; डॉक्टर हत्या प्रकरणात आरोपीच्या सासूने सांगितलं तिच्या मुलीसोबत काय झालं
kolkata RG Kar Medical College Hospital murder case: या प्रकरणी संजोय रॉय नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. संजोय रॉयबाबत तिच्या सासूने अत्यंत धक्कादायक माहिती सांगितली आहे.
नवी दिल्ली- कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशातील आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. देशभरात अनेक ठिकाणी डॉक्टरांनी आंदोलन सुरु केले आहे. या प्रकरणी संजोय रॉय नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. संजोय रॉयबाबत तिच्या सासूने अत्यंत धक्कादायक माहिती सांगितली आहे.
संजोय रॉयच्या सासूने सांगितलं की, 'माझे आणि संजोयचे संबंध नेहमी ताणलेले राहिले. त्याच्या आणि माझ्या मुलीचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याचं हे दुसरं लग्न होतं. सुरुवातील सहा महिने सगळं व्यवस्थित होतं. माझी मुलगी तीन महिन्यांची गरोदर झाली. त्यावेळी तिचा गर्भपात झाला. त्यानंतर त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. '

