

Krishna Janmashtami Tourism
esakal
मध्य प्रदेशातील उज्जैनच्या ‘महाकाल लोक’च्या धर्तीवर आता इंदूरजवळील जानापाव या धार्मिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या स्थळाचा विकास करण्यात येणार आहे. भगवान परशुराम यांची जन्मभूमी मानल्या जाणाऱ्या जानापाव येथे ‘श्री परशुराम-श्रीकृष्ण लोक’ हा भव्य प्रकल्प साकारला जाणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात या १७ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.