‘मशीद बांधण्यासाठी ३६००० मंदिरे उद्ध्वस्त; ती पुन्हा मिळवू’

KS Eshwarappa said 36,000 temples demolished to build mosques
KS Eshwarappa said 36,000 temples demolished to build mosquesKS Eshwarappa said 36,000 temples demolished to build mosques

मशिदी (mosque) बांधण्यासाठी ३६,००० मंदिरे नष्ट करण्यात आली होती. त्या सर्वांवर कायदेशीर हक्क मिळवून दिला जाईल. त्यांना इतरत्र मशिदी बांधू द्या आणि प्रार्थना करू द्या. परंतु, आम्ही त्यांना मंदिरांवर मशिदी बांधण्याची परवानगी देऊ शकत नाही. हिंदू कायदेशीररीत्या सर्व मंदिर पुन्हा प्राप्त करतील, असे मंदिर-मशीद वादावर कर्नाटकचे भाजपचे माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा (KS Eshwarappa) शुक्रवारी म्हणाले. (KS Eshwarappa said 36,000 temples demolished to build mosques)

२१ एप्रिल रोजी कर्नाटकात (Karnataka) मंदिर-मशीद वाद समोर आला. मंगळुरूच्या बाहेरील जुन्या मशिदीच्या खाली हिंदू मंदिरासारखी वास्तुशिल्प रचना सापडली. काहींनी असे म्हटले आहे की, मशीद (mosque) बांधण्यापूर्वी या ठिकाणी मंदिर होते. कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत नूतनीकरणाचे काम थांबवावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे.

KS Eshwarappa said 36,000 temples demolished to build mosques
वादंग उठल्यानंतर चंद्रकांत पाटील नमले; सुप्रिया सुळेंबद्दल म्हणाले...

मंदिर-मशीदचा (mosque) वाद बुधवारी तेलंगणातही पोहोचला. राज्यात अनेक मंदिरे पाडण्यात आली आणि त्यावर मशिदी बांधल्याचा आरोप राज्य भाजपचे प्रमुख बंदी संजय यांनी केला. आता या मशिदींचे उत्खनन केल्यास तेथे शिवलिंगे सापडण्याची शक्यता असल्याचेही बंदी संजय यांनी सांगितले.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना आव्हान देतो, तेलंगणातील सर्व मशिदी खोदून काढू या. सांगाडे सापडले तर आम्ही मशिदी त्यांच्याकडेच सोडू. जर शिवलिंग सापडले तर आम्ही ते आमच्या ताब्यात घेऊ. रामसेना प्रमुख प्रमोद मुथालिक म्हणाले की, शांतता राखायची असेल तर मुस्लिम समाजाने जी मंदिरे उद्ध्वस्त करून मशिदीत रूपांतरित केली ती हिंदूंना परत करावी लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com