कर्नाटकातील ओमिक्रॉन रूग्णाच्या रिपोर्टसंदर्भात चौकशीचे आदेश

संबंधित व्यक्ती एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होती, तेथे त्या व्यक्तीने काही बैठका घेतल्या होत्या.
R. Ashok
R. AshokANI

बंगळुरू : भारतात गुरुवारी कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रोनचे (Omicron Variant) दोन रूग्ण कर्नाटकात (Karnataka ) आढळल्यानंतर देशाच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, कर्नाटकात आढळलेला 66 वर्षीय रूग्णाने कोरोना चाचणी (Corona Report) अहवाल निगेटिव्ह असल्याचे दाखवत 27 डिसेंबर रोजी दुबईमार्गे (Dubai) दक्षिण अफ्रिकेला (South Africa) रवाना झाला आहे. त्याच्या आलेल्या कोरोना चाचाणीचा एक अहवाल पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असा प्राप्त झाला आहे, जो की संशयास्पद आहे, त्यामुळे या अहवालांची चौकशीचे आदेश कर्नाटक सरकारने दिले आहेत, अशी माहिती कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक (Karnataka Minister R. Ashok) यांनी दिली.

R. Ashok
कर्नाटकात आढळलेल्या ओमिक्रॉन संक्रमित रुग्णानं सोडला देश!

आर. अशोक म्हणाले की, कर्नाटक सरकारने RT-PCR रिपोर्टवरील पहिल्या ओमिक्रॉन (Omicron) प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय संबंधित व्यक्ती एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होती, तेथे त्या व्यक्तीने काही बैठका घेतल्या होत्या. याठिकाणी संबंधित व्यक्तीचे कोरोना चाचाणीचे दोन आहवाल प्राप्त झाले होते ज्यात एक चाचणी अहवाल पॉझिटिव्ह तर दुसरा निगेटिव्ह आला होता, मात्र, यात काही तरी संशयास्पद असे आहे, त्यामुळे याची चौकशी करण्याबरोबरच लॅबची तपासणीदेखील करणे आवश्यक आहे, असे आर. अशोक यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, देशात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि विविध राज्यांतर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच ओमिक्रॉन विषाणूचा सर्वाधिक धोका असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने लक्ष देण्याचे तसेच त्यांची चाचणी करण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत.

कर्नाटक सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

कर्नाटकात ओमिक्रोनचे रूग्ण आढळून आल्यानंतर कर्नाटक सरकारने नव्याने गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. यामध्ये ज्या नागरिकांचे पूर्ण लसीकरण झालेले नाही अशांना मॉल आणि सिनेमागृहांमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली आज अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक झाली त्यानंतर नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

1. बैठकीला उपस्थित असलेले मंत्री आर. अशोक म्हणाले की, संपूर्ण लसीकरण केल्याशिवाय कोणालाही राज्यातील मॉल्स आणि सिनेमागृहांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

2. जोपर्यंत विद्यार्थांच्या पालकांचे पूर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळांमध्ये ऑफलाइन वर्गांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. कोरोनाचा नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट पाहता शाळा आणि महाविद्यालयांमधील सर्व सांस्कृतिक उपक्रम 15 जानेवारी 2022 पर्यंत पुढे ढकलण्यास सांगण्यात आले आहे.

3. राज्यातील विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोनाची चाचणी घेतली जाईल. प्रवाशांचे चाचणी अहवाल आल्यानंतरच त्यांना बाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार आहे,

4. राज्यभरातील रुग्णालयांमध्ये पुन्हा एकदा कोविड बेड सुरू करण्यात येणार आहेत. तसेच यापूर्वी स्थापन केलेल्या समित्यांद्वारे ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवले जाईल आणि राज्यभरात कोविड नियंत्रण कक्ष पुन्हा सुरू केले जातील, असेही ते म्हणाले. कोविड औषधांचा तुटवडा नाही ना याची खात्री करण्यासाठी, लस आणि औषधे आगाऊ खरेदी केली जातील, असेही आर. अशोक यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com