कुद्रेमानीत मराठीच्या जयजयकारात ग्रंथदिंडीचा सोहळा 

जितेंद्र शिंदे
रविवार, 23 डिसेंबर 2018

बेळगाव - घरांसमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, गल्लीत सर्वत्र दिवसाने भगवे ध्वज, लक्षवेधी पताका, अबालवृध्दांचा सहभाग, विठू नामाचा अखंड गजर आणि छत्रपती शिवरायांसह मराठीच्या जयजयकारात ग्रंथदिंडीचा सोहळा पार पडला. या सर्वसमावेशक ग्रंथदिंडीमुळे पाहुणेही भारावून गेले. 

बेळगाव - घरांसमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, गल्लीत सर्वत्र दिवसाने भगवे ध्वज, लक्षवेधी पताका, अबालवृध्दांचा सहभाग, विठू नामाचा अखंड गजर आणि छत्रपती शिवरायांसह मराठीच्या जयजयकारात ग्रंथदिंडीचा सोहळा पार पडला. या सर्वसमावेशक ग्रंथदिंडीमुळे पाहुणेही भारावून गेले. 

बलभीम साहित्य संघ, ग्रामस्थ आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कुद्रेमानीत आयोजित 13 व्या मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी एक दिमाखदार सोहळा ठरली. सकाळी 9 वाजता गावच्या वेशीतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरापासून ग्रंथदिंडीला सुरवात झाली. संदीप पाटील दांपत्याने श्री विठ्ठल-रखुमाई मूर्ती पूजन केले. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांनी पालखी पूजन केले. यल्लाप्पा ल. धामणेकर यांनी ग्रंथपूजन केले. रवळनाथ दूध डेअरीचे उपाध्यक्ष दुर्गाप्पा बडसकर यांनी ग्रंथदिंडीचे उद्‌घाटन केले. त्यानंतर चव्हाट गल्लीतून ग्रंथदिंडी निघाली. 

या ग्रंथदिंडीत शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांनी विविध पारंपरीक वेषभूषा केली होती. लेक वाचवा, लेक शिकवा, पर्यावरण वाचवा, पुस्तकांचे महत्व आदी विषयांवरील फलक लक्षवेधी होती. विद्यार्थींनींनी टिपरी नृत्यावर फेर धरला होता. तर मुले लेझीम खेळत होती. दोन रांगांमधून दिमाखात फिरणाऱ्या भगवा ध्वजाचे चित्र विलोभनीय होते. 

दिंडी छत्रपती शिवाजी चौकात पोचल्यानंतर शिनोळी येथील मारूती पाटील यांनी अश्‍वारूढ शिवपुतळ्याचे पूजन केले. विक्रम पाटील यांनी प्रवेशव्दार उद्‌घाटन केले. विष्णू जांबोटकर यांनी कै. परशराम मिनाजी गुरव साहित्य नगरीचे उद्‌घाटन केले. परशराम बिजगर्णीकर यांनी ग्रंथदालनाचे उदघाटन केले. तर प्रशांत पाटील यांनी परशराम गुरव यांच्या स्मारकाचे पूजन करून ग्रंथदिंडीची सांगता झाली.

लक्षवेधी लेझीम
संमेलनाच्या ग्रंथदिंडीत कोलीन्द्रे (ता. आजरा) येथील भावेश्वरी लेझीम पथकाने लेझीम सादर केले. मुलींच्या या पथकाने लोकांची वाहवा मिळविली. साहित्यिक डॉ राजू पोतदार यांनीही यामध्ये ताल धरला.

Web Title: Kudremani Marathi sahitya Sammelan