Kuldeep Yadav Reception: कुलदीप यादवच्या रिसेप्शनमध्ये विंटेज कार आणि चार्टर्ड फ्लाईट्सचा थाट, चर्चा मात्र योगी आदित्यनाथ यांच्या एंट्रीची!
Yogi Adityanath’s Presence Steals the Spotlight: कुलदीप यादव यांच्या लखनऊमधील शाही रिसेप्शनमध्ये विंटेज कार, चार्टर्ड फ्लाईट्स आणि दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या एंट्रीचीच सर्वाधिक चर्चा रंगली. कुलदीपने पत्नी वंशिकासह खास सोहळ्यात पाहुण्यांचे स्वागत केले.
देश: भारतीय क्रिकेट संघाचा 'चायनामन' फिरकीपटू कुलदीप यादव याच्या लग्नाचा शाही रिसेप्शन सोहळा लखनऊमध्ये पार पडला. या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती.
#WATCH | Uttar Pradesh CM Yogi Adityanath attends the wedding reception of Indian cricket team's World Cup-winning star spinner Kuldeep Yadav and Vanshika in Lucknow. pic.twitter.com/CINl4hAEyG