विश्वासदर्शक ठरावाआधीच कुमारस्वामींची हार?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

कर्नाटकमध्ये कुमारस्वामींनी बहुमत चाचणी घेण्याआधीच हार पत्करल्याचे संकेत दिले असून भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे.  मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, की आमचे सरकार 14 महिन्यांनंतर अंतिम पायरीवर पोहोचले आहे. जेडीएस-काँग्रेसचे सरकार बनल्यापासूनच ते पाडण्यासाठी वातावरण बनविण्यात आले. मी कोणासमोर हात जोडणार नाही मात्र देवाला आजही हात जोडून विचारेन की अशा परिस्थितीमध्ये मला मुख्यमंत्री का बनविले.

बंगळुरू : कर्नाटकमध्ये कुमारस्वामींनी बहुमत चाचणी घेण्याआधीच हार पत्करल्याचे संकेत दिले असून भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे.  मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, की आमचे सरकार 14 महिन्यांनंतर अंतिम पायरीवर पोहोचले आहे. जेडीएस-काँग्रेसचे सरकार बनल्यापासूनच ते पाडण्यासाठी वातावरण बनविण्यात आले. मी कोणासमोर हात जोडणार नाही मात्र देवाला आजही हात जोडून विचारेन की अशा परिस्थितीमध्ये मला मुख्यमंत्री का बनविले.

कुमारस्वामी पुढे म्हणाले की, मी कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही. भाजप आताही सरकार बनवू शकते. बहुमताचा आकडा असेल तर घाई कशाला. तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारीही सरकार बनवू शकता. मी सत्तेचा दुरुपयोग करणार नाही. यानंतर भाजपप्रदेशाध्यक्ष बी एस येडीयुराप्पा यांनी त्यांचा पक्ष यावर राष्ट्रीय नेतृत्वासोबत विचार करून पुढील कार्यक्रम आखेल असे सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री कुमारस्वामींनी भाजपाला पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. आमच्या आमदारांना मोठ्या प्रमाणावर लाच देण्याचा प्रयत्न झाला. त्यांना 40 ते 50 कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले. हे पैसे कोणाचे आहेत? आमच्या पक्षाचे आमदार श्रीनिवास गौडा यांना भाजपने सरकार पाडण्यासाठी पाच कोटी रुपयांची ऑफर दिली होती, अशा प्रकारचे गंभीर आरोप केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kumaraswamy ready to left power before confidence motion