कुमारस्वामींचा आज शपथविधी 

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

कर्नाटकचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून एच. डी. कुमारस्वामी उद्या (ता. 23) शपथ घेणार आहेत. शक्तीसौध विधानसौधच्या समोर सायंकाळी 4.30 वाजता होणाऱ्या शपथविधी समारंभाची जोरदार तयारी सुरू आहे

बंगळूर - कर्नाटकचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून एच. डी. कुमारस्वामी उद्या (ता. 23) शपथ घेणार आहेत. शक्तीसौध विधानसौधच्या समोर सायंकाळी 4.30 वाजता होणाऱ्या शपथविधी समारंभाची जोरदार तयारी सुरू आहे. देशातील विविध पक्षांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी 80 बाय 40 फुटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, शिवाय सुमारे एक लाखापेक्षा अधिक लोकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्वांना हा कार्यक्रम पाहता यावा यासाठी पंधराशेपेक्षा अधिक एलईडी स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत. या शपथग्रहण कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी स्वत: प्रामुख्याने तिसऱ्या आघाडीशी हातमिळवणी करणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना व मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kumarswamy Swearing today