कुंभमेळ्यात हेलिकॉप्टरने भाविकांवर फुलांचा वर्षाव

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जानेवारी 2019

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक येथे आले आहेत. शाही स्नान करुन कुंभमेळ्याची सुरवात झाली. या कुंभमेळ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून उपस्थित भाविकांवर फुलांचा वर्षाव केला गेला. त्यानंतर या लाखो भाविकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. मात्र, यादरम्यान झालेल्या पुष्प वर्षावामध्ये माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या नावांचा 'गजर' करण्यात आला.  

प्रयागराज येथे होत असलेल्या कुंभमेळामध्ये अनेक संत लाखो संख्येने उपस्थित राहिले. या कुंभमेळ्यामध्ये योगी सरकारने भाविकांवर फुलांचा वर्षाव केला असला तरी अखिलेश यादव आणि मायावती यांची नावं या भाविकांकडून घेतली जात होती. आज सकाळी सहाच्या सुमारास सुरु झालेल्या शाही स्नानास मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर प्रशासनाच्या पूर्वतयारीनुसार निळ्या रंगाच्या हेलिकॉप्टरमधून सकाळी दहाच्या सुमारास भाविकांवर झेंडू आणि गुलाबांच्या फुलांचा वर्षाव केला गेला. त्यानंतर अखिलेश यादव आणि मायावती यांना यापासून बोध घेण्याचा सल्ला देत आवाज देणे सुरु केले. अखिलेश आणि मायावती तुम्हीही हा मेळा पाहा, असे हे भाविक ओरडत होते.  

दरम्यान, कुंभमेळ्याच्या निमित्ताने भाजप सरकार सर्वसामान्यांच्या मनात उतरण्याचे काम करत आहे. तसेच कुंभमेळासाठी देशभरातून भाविक जमा होत असतात. त्यामुळे विकास आणि व्यवस्था भाजपच्या राज्यात व्यवस्थित आहे, हे दाखविण्याचे काम यानिमित्ताने केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kumbh Mela helicopter rides flowers on the devotees