
नवी दिल्ली : कुंभमेळ्यादम्यान त्रिवेणी संगमावरील पाण्याची गुणवत्ता ही स्नानासाठी योग्य होती असा अहवाल, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने(सीपीसीबी) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे सादर केला आहे. उपलब्ध आकडेवारीच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आल्याचे ‘सीपीसीबी’ने सांगितले आहे.