

Lal Khurma
esakal
उत्तर प्रदेशातील खाद्यसंस्कृती आता जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘वन डिस्ट्रिक्ट वन क्यूजीन’ (ODOC) म्हणजेच 'एक जिल्हा, एक खाद्यपदार्थ' या योजनेला राज्य कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या योजनेमध्ये कुशीनगरच्या जगप्रसिद्ध पारंपरिक 'लाल खुरमा' (Lal Khurma) या मिठाईचा समावेश करण्यात आला असून, यामुळे या मिठाईला आता ग्लोबल ब्रँड बनवण्याची तयारी सुरू झाली आहे.