लग्नातला एक विधी ठरला १३ जणांचा काळ

PM नरेंद्र मोदींनी गोरखपूरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे.
Marriage
MarriageSakal Digital

गोरखपूर : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. विहीरीवर असलेला स्लॅब कोसळल्यानं ही घटना घडल्याचं समजतंय. या घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. कुशीनगरमध्ये काल रात्री ८:३० वाजता लग्नाच्या कार्यक्रमात घडलेल्या या घटनेत १३ जणांचा विहीरीत पडून मृत्यू झाला. घटना घटडल्यानंतर परिसरात मोठी खळबळ माजली. स्थानिकांच्या मदतीने रात्री मदतकार्य सुरु होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. (Kushirnagar accident: 13 women died in well incident)

Marriage
विहीरीत पडून १३ जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

घरात लग्न समारंभ असल्यानं आनंदांचं वातावरण होतं. लग्नाची मोठी धावपळ सुरु असल्यानं घरातील महिला मंडळाची लगबग सुरु होती. मात्र एक मोठी दुर्घटना घडली अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. विहीरीच्या स्लॅबवर थांबलेल्या 30 जणांच्या वजनामुळे स्लॅब कोसळला अन् तब्बल ३० जण विहीरीत पडले. त्यांना बाहेर काढायला तब्बल दीड तास लागले. तोपर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला. मटकोडवा या हळदीच्या विधीसाठी महिला व मुली विहिरीजवळ एक विधी करत असताना हा अपघात झाला.

Marriage
सप, बसपमुळे बुंदेलखंड मागे राहिला: योगी आदित्यनाथ

काय असतो हा विधी?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नौरंगिया ग्रामसभेच्या शाळेत विहिरीच्या पूजेसाठी महिला व मुली जमल्या होत्या. विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली होती. गर्दी जास्त होती. विहिरीच्या जवळ बांधलेल्या कठड्यावर मुली व महिला बसलेल्या होत्या. विहिरीचा स्लॅब कमकुवत असल्यानं तो तुटला आणि हा अपघात झाल्याचं समजतंय. गावातील काही लोकांचं म्हणणं आहे की, त्यांना विहिरीच्या स्लॅबवर चढण्यास मनाई केली होती, परंतु कोणीही ऐकलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com