esakal | e-Shram पोर्टलला सकारात्मक प्रतिसाद, ३ कोटी कामगारांची नोंदणी
sakal

बोलून बातमी शोधा

The right canal gave work to the hands of the laborers Bhandara news

e-Shram पोर्टलला सकारात्मक प्रतिसाद, ३ कोटी कामगारांची नोंदणी

sakal_logo
By
ओमकार वाबळे

केंद्र सरकारने कामगारांसाठी सुरू केलेल्या इ-श्रम पोर्टलला पहिल्या टप्प्यात चांगला रिस्पॉन्स मिळत असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत 2.5 कोटींहून अधिक असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. हे पोर्टल 26 ऑगस्ट 2021 रोजी लाँच करण्यात आले. पोर्टल असंघटित कामगारांचा पहिला राष्ट्रीय डेटाबेस आहे. ज्यात स्थलांतरित कामगार, बांधकाम कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगार यांचा समावेश आहे.

कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी शुक्रवारी ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली. देशभरातील तीन कोटीहून अधिक असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे, असे ट्वीट त्यांनी केले.

38 कोटी कामगारांना फायदा

ई-श्रम पोर्टल देशातील 38 कोटीहून अधिक असंघटित कामगारांची मोफत नोंदणी करता येणार आहे. त्यांना सामाजिक सुरक्षा योजनांच्या वितरणासाठी मदत करण्यात येईल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी गेल्या महिन्याच्या अखेरीस ई-श्रम पोर्टल सुरू केले होते. त्याचा फायदा कामगारांना होत असल्याचं यादव म्हणाले.

loading image
go to top