
हानले (लडाख): लडाखमधील चीन सीमेनजीक हानले गावातील तरुण अंधाऱ्या रात्री आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आकाशातील चमचमत्या ताऱ्यांकडे पाहतात, जणू हे तारे त्यांचा आशा आणि अपेक्षांवर उजळत आहेत. देशातील पहिल्या आकाश प्रकल्पात या खगोलदूतांनी ताऱ्यांचे निरीक्षण व्यवसाय म्हणून स्वीकारले आहे. त्यांच्या दुर्बिणीतून विशाल खगोलविश्वातील ताऱ्यांचे निरीक्षण करण्याची संधी खगोलप्रेमी व पर्यटकांना मिळत आहे.