
26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी लक्खा सिधाना या व्यक्तीचे नाव समोर येत आहे
नवी दिल्ली- 26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी लक्खा सिधाना या व्यक्तीचे नाव समोर येत आहे. लक्खा सिधाना हा पंजाबचा राहणारा आहे. गुन्हेगारी जगतामध्ये सिधानाचे मोठे नाव होते. त्यानंतर तो राजकारणात आला आणि त्यानंतर सामाजिक कार्यात सक्रिय झाला. पंजाबच्या बठिंडाचा रहिवाशी असलेला लक्खा कबड्डीचा खेळाडू राहिला आहे. खेळापासून गु्न्हेगारी आणि नंतर राजकारणात आलेल्या लक्खाने शेतकरी आंदोलनात भाग घेतला. आता दिल्ली हिंसेतही त्याचे नाव समोर येत आहे.
लक्खा सिधानाचे खरे नाव लखबीर सिंह आहे. पंजाबच्या बठिंडाचा रहिवाशी असणारा लक्खा सिधाना डबल एमए आणि कधी कबड्डीचा एक चांगला खेळाडू होता. लक्खावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि मारहाणीचे अनेक आरोप आहेत.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार 'मास्टर'; कधी माहितीये?
पंजाबचे अर्थमंत्री मनप्रीत बादल यांनी आपली पार्टी पंजाब पीपल्स पार्टी (पीपीपी) बनवली होती. या पार्टीकडून सिधानाने रामपुरा क्षेत्रातून विधानसभा निवडणूक लढवली होती. पण, या निवडणुकीत त्याची रक्कम जप्त झाली होती. या निवडणुकीदरम्यान त्याच्यावर भगता भाई परिसरात फायरिंग झाली होती, ज्यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. या घटनेनंतर सिधानाने तक्कालीन अकाली मंत्री सिकंदर सिंह मलूका यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
सिधाना गेल्या काही वर्षांपासून पंजाबी सत्कार कमेटीसोबत जोडला गेला असून पंजाबी भाषा वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. याशिवाय तो पंजाबमधील तरुणांना आपल्यासोबत जोडत आहे. काही दिवसांपूर्वी लक्खाने नॅशनल हायवेवरील साईन बोर्डवर पंजाबी भाषेला तिसरे स्थान देण्यात आल्याने काळे फासले होते. सिधानाजवळ दोन महागड्या लग्झरी गाड्या आहेत. 25 जानेवारीला सिधानाने सिंघू बॉर्डवर शेतकरी आंदोलनाच्या स्टेजवर चढत म्हटलं होतं की तरुणांची जशी इच्छा आहे, तशीच परेड होईल.