esakal | Lakhimpur Kheri Violence : निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव करणार चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

Lakhimpur Violence : निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव करणार चौकशी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथं झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडे सोपवण्यात आली आहे.

Lakhimpur Violence : निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव करणार चौकशी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथं झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडे सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव यांच्यावर ही जबाबदारी दिली.याबाबत एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला होता. मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीखाली चिरडून चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर हिंसाचार झाला होता.

अधिसूचनेत म्हटलं आहे की, राज्यपालांनी ३ ऑक्टोबरला लखीमपूर खिरीमध्ये ८ लोकांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी आयोग अधिनियम १९५२ च्या कलम ३ नुसार अधिकारांचा वापर करून राज्यपालांना इलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव यांचा चौकशी आय़ोग नियुक्त केला. यांचे मुख्य कार्यालय हे लखीमपूरमध्ये असणार आहे.

निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव यांना दोन महिन्याचा कालावधी चौकशीसाठी देण्यात आला आहे. दोन महिन्यात चौकशीचा अहवाल द्यावा लागणार असून या कालावधीमध्ये सरकारकडून बदल करण्यात येऊ शकतो असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

loading image
go to top