UP हायव्होल्टेज ड्रामा; विरोधक आक्रमक, सरकारचाही प्रतिकार

lakhimpur kheri
lakhimpur kheriesakal

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरीमध्ये (lakhimpur kheri) केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. आता यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून इथली परिस्थिती तणावपूर्ण आहे. या भागात येण्यापासून विरोधी पक्ष नेत्यांना अडवलं जात आहे. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी (avnish avasthi) यांनी लखनऊ विमानतळाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (bhupesh baghel) आणि पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर एस रंधावा (sukhjinder randhava) यांना लखनऊ विमानतळावर उतरू देण्यास मनाई केली आहे. तर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अवस्थी यांच्या आदेशावर प्रश्न निर्माण केला आहे. दरम्यान बघेल आणि रंधावा यांनी आज (ता.४) लखीमपूर खेरीला भेट देण्याची घोषणा केली आहे, जिथे काल झालेल्या दुर्घटनेत 8 लोकांचा मृत्यू झाला.

लखीमपूर खेरी दुर्घटना : अनेक बड्या नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यापासून मज्जाव

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने, आशिष मिश्राने काल आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचं सांगण्यात येतंय. या घटनेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे. प्रशासनाने आता या परिसरात 144 कलम लागू केलं असून विरोधी पक्ष नेत्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून अटकाव करण्यात येतोय. आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी दिला आहे. काल रात्रीपासून या ठिकाणी शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत. जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे.

अखिलेश यादवांच्या निवासस्थान बाहेर पोलीस बंदोबस्त

माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या विक्रमादित्य मार्गावरील निवासस्थानाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, लखीमपूर खेरी येथे त्यांच्या नियोजित भेटीपूर्वी 4 शेतकऱ्यांसह 8 लोकांचा काल झालेल्या संघर्षात मृत्यू झाला.

शेतकऱ्यांचं अंतिम संस्कार केलं जाणार नाही - राकेश टिकेत

आज पहाटे साडे चार वाजता लखीमपूर या ठिकाणी शेतकरी नेते राकेश टिकेत पोहोचले असून त्यांनी शेतकऱ्यांची एक बैठक घेतली. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी या बैठकीत केली आहे. जोपर्यंत या दोघांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृत शेतकऱ्यांचं अंतिम संस्कार केलं जाणार नाही असा इशारा राकेश टिकेत यांनी दिला आहे. या घटनेवर पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या एफआयआरमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाचे, आशिष मिश्रा यांचं नाव नोंदवण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.

प्रियांका गांधीनाही रोखलं

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी लखीमपूरमध्ये जाण्यापासून प्रशासनाने रोखलं आहे. त्यांना सीतापूरमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे. या दरम्यान प्रियांका गांधी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. तसेच उत्तर प्रदेशमधील विरोधी पक्षांचे प्रमुख नेते अखिलेश यादव आणि सतिश चंद्र मिश्रा यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com