esakal | लखीमपूर घटनेनंतर शेतकरी आक्रमक; रेल रोको आंदोलनाची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Lakhimpur Kheri Violence

लखीमपूर घटनेनंतर शेतकरी आक्रमक; रेल रोको आंदोलनाची घोषणा

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये आंदोलन करुन घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांचा गाडीखाली चिरडल्या गेल्याने मृत्यू झाला. यावेळी झालेल्या हिंसाचारात एकूण ८ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद आता देशभरात उमटताना दिसून येता आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आता शेतकरी संघटनांनी रेल रोको आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच संदर्भात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिसंचाराच्या निषेधार्थ १२ ऑक्टोबरपासून उत्तर प्रदेशच्या सर्व जिव्ह्यांत कलश यात्र काढण्यात येणार असून १८ ऑक्टोबरला रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनांनी जाहीर केले आहे. त्यानंतर २६ ऑक्टोबरला लखनऊमध्ये किसान महापंचायत घेण्यात येणार आहे. तसेच पुढच्या काही काळात वेगवेळ्या आंदोलनातून या कृत्याचा निषेध शेतकरी करणार असल्याची माहिती योगेंद्र यादव आणि राकेश टिकैत यांनी दिली आहे.

हेही वाचा: खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढलं - उद्धव ठाकरे

इत चार जणांच्या मृत्यूला हत्या म्हणता येणार नाही: राकेश टिकैत

यावेळी लखीमपूर हिंसाचारात भाजपच्या लोकांच्याही हत्या केल्याच्या आरोपावर बोलताना राकेश टिकैत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. "त्या लोकांच्या हत्या झाल्या नसून ती कृतीची प्रतिक्रिया होती. त्यांना मारण्याचं कोणतंही नियोजन नव्हतं त्यामुळे त्याला हत्या म्हणु शकत नाही, ” असे राकेश टिकैत यांनी यावेळी सांगितले

loading image
go to top