esakal | पीडित कुटुंबीयांच्या भेटीनंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रीया, म्हणाल्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Gandhi

पीडित कुटुंबीयांच्या भेटीनंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रीया, म्हणाल्या...

sakal_logo
By
सुधीर काकडे

लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशमध्ये राजकारण तापलेलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही हा मुद्दा उचलं आहे. त्यातच आज काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रविवारी लखीमपूरमध्ये झालेल्या या हिंसाचारात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी अटक केली होती.

हेही वाचा: लखीमपूर प्रकरणी दोघांना अटक; केंद्रीय मंत्र्याचा मुलगा बेपत्ता

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी लखीमपूर प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. यावेळी मृतांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी केल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले. आंदोलन केल्यानंतर घरी निघालेल्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्यात आलं, हि घटना गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेत गाडी खाली आल्यानं लोकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट दिसत असून देखील हाणामारीमध्ये लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय असा आरोप प्रियांका गांधी यांनी सांगितलं.

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या लखीमपूर प्रकरणातील दोषींना अटक करावी ही मागणी घेऊन काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू हे देखील लखीमपूरकडे निघाले आहे. मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी साहरणपूरमध्ये ताब्यात घेतलं आहे.

loading image
go to top