Lala Lajpat Rai Death Anniversary : लालाजींना ‘पंजाब केसरी’ का म्हटले जाते? वाचा रोचक गोष्टी

ब्रिटींशांच्या सत्तेचा पाया खिळखिळा करण्यात लालाजींचा वाटाही तितकाच मोठा होता.
Lala Lajpat Rai Death Anniversary
Lala Lajpat Rai Death Anniversary Esakal

भारतीय स्वातंत्र्य चळवळतील एक महान क्रांतीकारक म्हणून ओळखले जाणारे लाला लजपतराय यांची आज पुण्यतिथी आहे. लालाजींना ‘पंजाब केसरी’ म्हणूनही गौरवण्यात आले होते. लालाजींचा जन्म पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके गावात 28 जानेवरी 1865 मध्ये झाला. लहानपाणापासूनच ते अत्यंत हुशार होते. बाल विवाह, हुंडा यांना त्यांनी कडाडून विरोध केला. स्त्री शिक्षणाचे ते समर्थक होते. बंगालच्या विभाजनाला लालांजींनी तीव्र विरोध केला.

सायमन कमिशनच्या निषेधार्थ मोठा जमाव लाहोरमध्ये जमला होता. ब्रिटीश पोलीस अधिकारी सांडर्स यांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्जचे आदेश दिले यात झालेल्या मारहाणीत लालाजी आजारी पडले आणि काही दिवसांत त्यांच्या मृत्यू झाला. एक महिन्यातच चंद्रशेखर आजाद, भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांनी लालाजींच्या हत्येचा बदला घेतला. ब्रिटींशांच्या सत्तेचा पाया खिळखिळा करण्यात लालाजींचा वाटाही तितकाच मोठा होता.

आता बघु या लालाजींना ‘पंजाब केसरी’ का म्हटले जाते? याच्या काही रोचक गोष्टी

● लालाजी हे पहिल्या महायुद्धादरम्यान युनायटेड स्टेट्समध्ये राहत होते, जिथे त्यांनी अमेरिकेच्या इंडियन होम रूल लीगची स्थापना केली होती.

● लालाजी यांना अरबी, उर्दू अशा अनेक भाषांचे सखोल ज्ञान होतं. एल्एल्‌. बी. ची पदवी मिळवलेले लालाजी अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून नावारुपास आले.

● त्या काळी इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल यांनी लाल-बाल-पाल त्रिमूर्ती स्थापन करून स्वदेशी चळवळीला चालना दिली.

 ● लाला लजपत राय यांनी 1928 साली घटनात्मक सुधारणांवर ब्रिटिश सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यासाठी विधानसभेत ठराव मांडला होता.

● लाला लजपत राय यांच्या कार्याची आठवण सदैव तेजोमय राहावी म्हणून हरियाणा राज्यातील हिसार येथील पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाला लाला लजपत राय यांचे नाव देण्यात आले आहे.

● लाला लजपत राय हे एक उत्तम लेखक देखील होते. त्यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकेही लिहिली आहेत. त्यामध्ये द स्टोरी ऑफ माय डिपोर्टेशन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका: अ हिंदू इम्प्रेशन, इंग्‍लंडचे भारतावरील कर्ज असे काही पुस्तके आजही उपलब्ध आहेत.

● लालाजींवरही लाठीहल्ला करण्यासाठी ब्रिटीश जराही कचरले नाही. लाठी हल्ल्यात झालेल्या जबर मारहाणीने 17 नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला.

● आजही लाला लजपत राय यांची पुण्यतिथी ओडिशातील लोकांनी शहीद दिन म्हणून साजरी करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com