लालूंचा मुक्काम तूर्त तुरुंगातच;जामिनावरील सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली 

पीटीआय
Friday, 11 December 2020

लालू प्रसाद यादव यांच्या शिक्षेचा निम्मा कालावधी अजून संपलेला नाही. लवकर सुटका करण्यासाठी ही अट पूर्ण करणे आवश्‍यक असते.यासाठी अद्याप ४० दिवसांचा अवधी आहे. जामिनावरील सुनावणी याआधीही पुढे ढकलली होती.

रांची - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामिवरील सुटकेसाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. झारखंड उच्च न्यायालयाने यासंबंधीची चौकशी अजून सहा आठवडे पुढे ढकलली आहे. 

चांद्रभूमीवर पडणार भारतीय पावले; नासाच्या चांद्रमोहिमेसाठी भारतीय वंशाच्या अंतराळवीराची निवड

लालू प्रसाद यादव यांच्या शिक्षेचा निम्मा कालावधी अजून संपलेला नाही. लवकर सुटका करण्यासाठी ही अट पूर्ण करणे आवश्‍यक असते. यासाठी अद्याप ४० दिवसांचा अवधी आहे. जामिनावरील सुनावणी याआधीही पुढे ढकलली होती. त्या वेळी केंद्रीय अन्वेषण विभागा (सीबीआय)ने झारखंड न्यायालयात आपली बाजू मांडली नव्हती. पशु खाद्याच्या निधीतील गैरव्यवहारात गुन्ह्यात लालू प्रसाद यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. यातील काही प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला आहे. दुमका कोशागार भ्रष्टाचार हा लालूंविरोधात शेवटच्या गुन्हा होता आणि यात जामिनावर सुटका त्यांना आशा होती. 

शत्रूंच्या उडणार चिंध्या; 1 मिनिटात 700 राऊंड फायर करणार DRDOची सब-मशीनगन

गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीत लालूंचे वकील कपिल सिब्बल यांनी जामीन अर्जाला जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याची टीका ‘सीबीआय’वर केली होती. बिहारच्या पशुपालन विभागातील अधिकाऱ्यांशी संबंधित १९९१ ते १९९६ मधील दुमका प्रकरणात साडेतीन कोटी रुपये कोशागारातून काढण्यात आले होते. या काळात लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. या प्रकरणात जामिनावरील सुनावणी पूर्ण न झाल्याने त्यांचा मुक्काम तुरुंगात आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lalu Prasad bail hearing was adjourned for four weeks