बिहारमध्ये पोस्टरवॉर! लालू 'भगवान विष्णू', नितीश 'अर्जुन'; मोदी-शहांना दाखवलं...

Bihar News
Bihar News
Updated on

नवी दिल्ली - बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन सरकार स्थापन झाल्यानंतर आरजेडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, सोमवारी पाटणा येथील राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) कार्यायाबाहेर एक पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमुळे बिहारचे राजकारण तापले आहे. (Bihar news in Marathi)

Bihar News
तुम्ही महागाई वाढवली, मी दिलासा देतोय, पण मी..; केजरीवालांचा भाजपला टोला

पोस्टरमध्ये आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना भगवान विष्णू विश्वाचा निर्माता म्हणून दाखवण्यात आले आहे. त्याच वेळी, त्यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे भगवान कृष्णाच्या रूपात, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सारथी म्हणून दिसत आहेत. नितीश अर्जुनाच्या भूमिकेत रथावर स्वार आहे. तसेच सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना अनेक देवांचे रूप दाखवले आहे.

राजदच्या या पोस्टरमध्ये बिहार आणि देशवासीयांना दिवाळी, छठ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच 'चला आता 2024 मध्ये हस्तिनापूर (नवी दिल्ली) स्वारी करा. या पोस्टरच्या तळाशी एक चित्र आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार हातात बाण आणि धनुष्य घेऊन रथावर बसलेले दाखवले आहेत, तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव रथ चालवताना दिसत आहेत. त्यांच्या हातात कंदील आहे.

Bihar News
Viral Video: वडिलांचे कर्ज माफ करण्यासाठी मुलाला करायला लावली 'नग्नपूजा'

पोस्टरमध्ये 'मिशन 2024, पार्थ पुढे जा', असा नाराही लिहिला आहे. यासोबतच या पोस्टरमध्ये पीएम नरेंद्र मोदींचा फोटोही असून फोटोखाली अहंकाराचे प्रतीक जो कोणाचेही ऐकत नाही, फक्त आपल्या मनातलं बोलतो, असं लिहिलं आहे. त्याचवेळी, गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोखाली लिहिले की, माणसांना माणसांशी लढवणारा, अधर्माचे प्रतीक. पोस्टरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा फोटो देखील लावला आहे. मात्र ते कोणाचा अवतार हे स्पष्ट केलेलं नाही.

राजद कार्यकर्त्यांनी लावलेल्या या पोस्टरमुळे बिहारमध्ये राजकीय पारा वाढला आहे. आरजेडीच्या या पोस्टरवर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला आहे. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांनी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेच्या ओळींद्वारे म्हटले की, जेंव्हा विनाश जवळ येतो, तेव्हा सर्वातआधी विवेकबुद्धी नष्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com