

सियाचीन ग्लेशियरमध्ये हिमस्खलनात शहिद झालेल्या लान्सनायक चंद्रशेखर हरबोला या जवानाचा मृतदेह तब्बल 38 वर्षांनंतर सापडला आहे. मृतदेह सापडल्याच्या बातमीने कुटुंबीयांच्या जखमा पुन्हा एकदा भावनीक झाल्या आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहीद जवानाचे पार्थिव मंगळवारी हल्द्वानीला त्याच्या मुळ गावी पोहोचण्याची शक्यता आहे.
सियाचीन ग्लेशियरच्या मधोमध हिमस्खलन झाल्या नंतर लांसनायक चंद्रशेखर हरबोला यांचा मृत्युदेह तबल 38 वर्षांनी सापडला आहे.शहीद जवानाचे शहीद मंगळवारी हळदवाणीला पोहोचन्याची शक्यता आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला, मूळचे उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील रानीखेत तहसील अंतर्गत असलेल्या बिंता हाथीखुर गावचे रहिवासी असून, 1971 मध्ये कुमाऊं रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. मे 1984 मध्ये, बटालियन लीडर लेफ्टनंट पीएस पुंडिर यांच्या नेतृत्वाखाली 19 सैनिकांची टीम ऑपरेशन मेघदूतसाठी निघाली.
29 मे रोजी संपूर्ण बटालियनची एका मोठ्या हिमस्खलनात गाडली गेली, शोधल्या नंतर सापडले नसल्याने त्याला शहिद घोषित करण्यात आले. त्यावेळी लान्स नाईक चंद्रशेखर यांचे वय 28 वर्षे होते. शनिवारी रात्री शहीदाच्या पत्नी शांती देवी यांना फोनवरून माहिती मिळाली की, शहीद लान्स नाईक चंद्रशेखर यांचा मृतदेह हिमनदीतून सापडला आहे.
माहिती मिळताच एसडीएम मनीष कुमार सिंह आणि तहसीलदार संजय कुमार यांच्यासह प्रशासनाचे पथक रविवारी दहरियाच्या रामपूर रोडवरील सरस्वती विहारमधील त्यांच्या घरी पोहोचले. शोक व्यक्त करत एसडीएमने कुटुंबीयांचे सांत्वन केले. सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी पुष्कर भंडारी यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार शहीद जवानाचे पार्थिव सोमवारी संध्याकाळपर्यंत हल्द्वानीला पोहोचणे अपेक्षित आहे.
राणीबाग येथील चित्रशिला घाटावर शहिदांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले. अंत्यसंस्काराची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.