अखेर १०८ वर्षांनंतर मिळाला जमिनीचा ताबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Land finally acquired after 108 years Judge Shweta Singh favor of Darbar Singh son-in-law Atul Singh
अखेर १०८ वर्षांनंतर मिळाला जमिनीचा ताबा

अखेर १०८ वर्षांनंतर मिळाला जमिनीचा ताबा

पाटणा : जमीनीच्या एका हिश्‍श्‍यासाठी बिहारमधील एका व्यक्तीने न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याचा १०८ वर्षांनंतर निकाल लागला आहे. यामुळे भोजपूर हे गाव सध्या चर्चेत आले आहे. तीन एकर जमीनीवर मालकी सांगत १९१४ मध्ये दरबारी सिंह यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यांनी नथुनी खान नावाच्या व्यक्तीकडून या जमिनीची खरेदी केली होती.

नथुनी यांचा १९११ ला मृत्यू झाल्यावर त्यांच्या वारसांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण झाले. या कुटुंबाच्या मालकीच्या असलेल्या नऊ एकर जागेपैकीच तीन एकर जागा दरबारी सिंह यांनी खरेदी केली होती. मात्र, त्यांची जमीनही अडकली. त्यावरून हे प्रकरण न्यायालयात गेले होते. विशेष म्हणजे फाळणीनंतर नथुनी यांचे सर्व वारसदार पाकिस्तानात निघून गेले होते. त्यानंतर ही जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात गेली. त्यानंतरही दरबारी यांच्या चार पिढ्या न्यायालयात लढत होत्या. अखेर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्‍वेता सिंह यांनी दरबारी सिंह यांचे पणतू अतुल सिंह यांच्या बाजूने निकाल दिला.

Web Title: Land Finally Acquired After 108 Years Judge Shweta Singh Judgement In Favor Of Darbar Singh Son In Law Atul Singh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..