Land For Job Scam : राबडी देवी, मिसा भारती यांना दिलासा ! 'लॅंड फॉर जॉब्स' प्रकरणी न्यायालयाचा हंगामी जामीन

नोकरीच्या बदल्यात जमिनी घेण्याच्या (लॅंड फॉर जॉब्स) गैरव्यवहार प्रकरणात आरोप झालेल्या बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांच्या कन्या मिसा भारती व हेमा यादव यांना राउज अव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी हंगामी जामीन दिला.
Land For Job Scam bihar ex cm rabri devi grant bail in railway job fraud
Land For Job Scam bihar ex cm rabri devi grant bail in railway job fraud Sakal

नवी दिल्ली : नोकरीच्या बदल्यात जमिनी घेण्याच्या (लॅंड फॉर जॉब्स) गैरव्यवहार प्रकरणात आरोप झालेल्या बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांच्या कन्या मिसा भारती व हेमा यादव यांना राउज अव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी हंगामी जामीन दिला. या आरोपींना चालू महिन्याच्या अखेरपर्यंत जामीन देण्यात आला आहे.

आरोपींच्या नियमित जामीन याचिकेवर युक्तिवाद करण्यासाठी वेळ हवा असल्याचे ईडीकडून विशेष न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर न्यायाधीश विशाल गोगणे यांनी आरोपींना हंगामी जामीन दिला. हवाला प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार सक्तवसुली संचलनालयाने गत ८ जानेवारी रोजी आरोपींविरोधात समन्स बजावले होते. राजद नेते लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना 'लॅंड फॉर जॉब्स' गैरव्यवहार झाला होता.

रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात लोकांकडून यादव कुटुंबातील सदस्यांनी जमिनी घेतल्याचा तपास संस्थांचा आरोप आहे. गैरव्यवहाराशी संबंधित अन्य प्रकरणात तत्कालीन रेल्वेमंत्री पवन बन्सल आणि त्यांचे भाचे विजय सिंघला यांच्यावरही आरोप झाले होते. यातील सिंघला यांच्या विरोधात सीबीआयने १० गुन्हे दाखल केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com