Jammu Kashmir: काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर हल्ल्याचा कट उधळला; तीन दहशतवादी ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lashkar commander with 3 terrorists killed in Awantipora encounter jammu kashmir

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर हल्ल्याचा कट उधळला; तीन दहशतवादी ठार

पुलवामा येथील अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यात एका परदेशी दहशतवाद्याचाही समावेश आहे. ADGP कश्मीरने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तैयबाचा कमांडर मुख्तार भट देखील सामील असल्याची माहिती मिळाली आहे. तो इतर दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांच्या तळावर आत्मघाती हल्ला करणार होता.अशा प्रकारे पोलीस आणि लष्कराने मिळून उरीसारखा हल्ला टळला आहे. दहशतवाद्यांकडून एक एके-47 रायफल, एक एके-56 रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.

एडीजी काश्मीर यांनी सांगितले एएसआय आणि सीआरपीएफ, आरपीएफ जवानांच्या हत्येत मुख्तार भटचा हात होता, दहशतवाद्यांना कंठस्नान घालल्यानंतरही सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांना घेराव घालण्यात आला. घेरल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले.

हेही वाचा: Bharat Jodo Yatra: राहुल गांधींसोबत चालण्यासाठी राज्यातील नेत्यांची 'कसरत'! लक्ष्य 382 किमी

हेही वाचा: Andheri By-Elections: प्रचार संपला, 'NOTA' गेम सुरु! ठाकरे गटाने केला गंभीर आरोप

बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यामध्ये एक दहशतवादीही मारला गेला. त्याचवेळी अवंतीपोरा येथे तीन दहशतवादी मारले गेले. दुसरीकडे, रंगरेथमध्ये तीन दहशतवाद्यांनाही पकडण्यात आले. त्याची चौकशी सुरू आहे. दहशतवाद्यांना आयईडीचा वापर करून सुरक्षा दलांच्या ताफ्याला उडवायचे होते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, सतर्कतेमुळे मोठा हल्ला टळला.

टॅग्स :Jammu And Kashmir