Corona Updates: मागील 24 तासांत 50 हजारांपेक्षा जास्त कोरोनामुक्त

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 12 November 2020

देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे.

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून प्रतिदिन कोरोना रुग्णवाढीचा आकडा 40 ते 50 हजारांदरम्यान वाढत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 47 हजार 905 रुग्णांचे निदान झाले असून 550 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 86 लाख 83 हजार 917 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामधील 1 लाख 28 हजार 121 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

80 लाखांपेक्षा जास्त कोरोनामुक्त-
दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून सावरणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत कोरोनाचे 80 लाख 66 हजार 502 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनातून 52 हजार 718 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

सक्रिय रुग्णांचा आकडो होतोय कमी-
देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे. सध्या देशात 4 लाख 89 हजार 294 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. मागील 24 तासांत सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजार 363 ने कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांचा कमी होणारा आकडा दिलासादायक आहे. 

वाढती चाचण्यांची संख्या फायदेशीर-
देशातील कोरोना (COVID19) चाचण्यांची संख्या दिवसेंदिवस सुधारताना दिसत आहे. चाचण्या वाढल्याने कोरोना रुग्ण ट्रेस करण्यात मदत होत आहे. बुधवारी एका दिवसात देशात कोरोनाच्या 11 लाख 93 हजार 358 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत झालेल्या चाचण्यांची संख्या पाहिली तर ती 12 कोटी 19 लाख 62 हजार 509 वर गेल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in last 24 hour more than 50 thousand corona cases recovered

Tags
टॉपिकस
Topic Tags: