गेल्या ४८ तासांत भारतीय लष्कराचे ६ जवान हुतात्मा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

एक बीएसएफ जवान. मछील सेक्टरवर फॉर्वर्ड पोस्टवर हिमस्खलनात लष्कराचे चार जवान बर्फाखाली गाडले गेले. त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आलं आहे. 

श्रीनगर : गेल्या ४८ तासांत भारतीय लष्कराचे ५ तर बीएसएफचे १ जवान जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनात हुतात्मा झाले. मध्य आणि उत्तर काश्मीरच्या विविध घटनात १० जणांचा बळी गेला. त्यात पाच जण लष्कराचे जवान आहेत. तर एक बीएसएफ जवान. मछील सेक्टरवर फॉर्वर्ड पोस्टवर हिमस्खलनात लष्कराचे चार जवान बर्फाखाली गाडले गेले. त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आलं आहे. 

गुरेश आणि रामपूर सेक्टरमध्येही हिमस्खलन झालं. मात्र यात जीवितहानी झाली नाही. तर नौगाम सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात एक बीएसएफ जवान हुतात्मा झाले. गंधरबाल जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनात ५ नागरिक ठार झाले.

सुरेश चित्ते शहीद
ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे भारतीय लष्करात सियाचीनमध्ये तैनात असलेले जवान सुरेश चित्ते हुतात्मा झाले आहेत. सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना चित्ते यांना वीरमरण आलं. सुरेश चित्ते हे मूळचे औसा तालुक्यातल्या आलमचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई आणि एक लहान भाऊ आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in the last 48 hours 6 indian army jawan martyred